VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
मुलचेरा, २१ नोव्हेंबर २०२३ ::- व्हॉलीबॉल हा खेळ आज अनेक लोकांमध्ये लोकप्रिय झाले असून हा खेळ एक आगळा वेगळा खेळ आहे.या खेळातून प्रत्येक खेळाडूंना आनंद द्विगुणित करता येते,या खेळाचे क्षेत्रस्तरीय स्तरावर एक वेगळी ओळख असून स्पर्धात्मक खेळ जिंकण्यासाठी खेळाडूंनी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असले तरी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंना शारीरिक व भावनिक कल्याणाचा प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले.
ते मूलचेरा तालुक्यातील कोलपल्ली येथे श्री.गणेश व्हॉलीबॉल क्रिडा मंडळ कोलपल्ली कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
या व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मूलचेरा नगरपंचायत चे नगरसेविका सुनीताताई कुसनाके तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील प्रतिष्ठित नागरिक हेमंतजी कुळसंगे,शामरावजी पोरतेट, गंगाराम मडावी,बाबूराव पेंदाम,ग्राम पंचायत सदस्य कालिदास कुसनाके,माजी सरपंच मनीष मारटकर,माजी सरपंच रामलु कुडमेथे,शिक्षक दिलीप सिडाम,ग्राम पंचायत सदस्या सौ जीवनकला तलांडे,सामाजिक कार्यकर्ते कमल बाला, सुशांत बेपारी, बिदांत समतदार,सैनुजी तलांडे,सुरेश कुसनाके,हरिदास चौधरी,अंकुश दुर्गे,अंकित दुर्गे,संदीप बडगे,जुलेख शेख,विनोद कावेरी सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.
या व्हॉलीबॉल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार शिक्षक दिलीप सिडाम व प्रतिष्ठित नागरिक हेमंतजी कुळसंगे यांच्या कडून आणि तृतीय पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्या कडून ठेवण्यात आले.या सोहळ्याचे संचालन व उपस्थितांचे आभार विनोद कंनाके यांनी मानले.तसेच या सामन्यासाठी स्थानिक प्रतिष्ठित नागरिकां कडून अनेक आकर्षक व रोख पुरस्कार ठेवण्यात आले. उदघाटन सोहळ्याला आविस व बीआरएस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यां सह कोलपल्ली येथील गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
