VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
स्व. संध्याताई दुधबळे मा जिल्हा परिषद अध्यक्ष जयंतीनिमित्त युवा कबड्डी सामने.
लखमापूर (बोरी), २६ नोव्हेंबर २०२३ ::-मैदानावर कबड्डी खेळताना प्रत्येक संघ एक सूर, एक लक्ष आणि एक विचार घेऊन खेळतो. हाच विचार प्रत्यक्ष जीवनातही आचरणात आणावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव दिलीपजी चलाख यांनी कबड्डीपटूंना केले. त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांमध्ये ऊर्जा कायम ठेवणाऱ्या सर्व कबड्डीपटूंना श्री. दिलीप चलाख जिल्हा सचिव भा ज पा यांनी शुभेच्छाही दिल्या.
स्व. संध्याताई दुधबळे मा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या जयंतीनिमित्त भव्य ग्रामीण कबड्डी सामने आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ तमदेव दुधबळे विनोद पेशट्टीवार रामचंद्र वरवाडे दिपक वासेकर अरून नैताम शरद वैरागडे भाग्यवान पिपरे युवा कबड्डी मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल बारसागडे व मंडळाचे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होते.
