Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्र काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्ष ऍड. शुभांगी शेरेकर सन्मानित...

महाराष्ट्र काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्ष ऍड. शुभांगी शेरेकर सन्मानित…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली, २९ नोव्हेंबर २०२३ ::- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेसच्या विविध आघाडी सेलच्या बैठकीचा आढावा घेण्यात आला.

     यावेळी मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. शुभांगीताई शेरेकर यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

       हा सत्कार फक्त माझ्या एकटीचा नसून सहकार विभागात काम करणाऱ्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा आहे, सर्वांनी मिळून उत्तम कामगिरी केल्याबद्दल हा सत्कार होत आहे, असे मत सत्कारमूर्ती ऍड. शुभांगी शेरेकर यांनी व्यक्त केले.

     त्यांच्या या सत्काराबद्दल गडचिरोली जिल्हा काँग्रेस सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकाऱ्याच्या वतीने अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular