Saturday, May 23, 2026
HomeEtapalliएटापल्ली वनपरिक्षेत्रात तीन लाखांचा गौणवणउपज जप्त,, पाच आरोपी अटक....

एटापल्ली वनपरिक्षेत्रात तीन लाखांचा गौणवणउपज जप्त,, पाच आरोपी अटक….

VAINGANGA NEWS 24

प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,

एटापल्ली, १६ डिसेंबर २०२३ ::- एटापल्ली येथिल वनउपज तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून दि. 16/12/2023 रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मा. उपवनसंरक्षक, आलापल्ली व मा. उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग यांचे मार्गदर्शनात आलापल्ली व भामरागड यांच्या संयुक्त चम्मु ने टाटा सुमो वाहन क्र. MH 34 K 0848 मध्ये 21 पोती गौणवनउपज लाख व 5 आरोपी नामे 1. संपती बापु चेनुरी, 2. रानारायण सत्यना चिपेली. 3. पुरूशौत्तम मल्लेश चेनुरी सर्व रा. परसेवाडा ता. सिरोंचा जि. गडचिरोली व 4. प्रदिप गॅनेंद्र रॉय रा. पि.व्हि. 85 बांधे, 5. सुभाश सुशेन ढाली पि.व्हि. 31 हरीहरपुर ता. पंखाजुर जि.काकेर (छ.गड) वरील मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन वनगुन्हा क्र. 08371/14/2023 दि. 16/12/2023 अन्वये जारी करण्यात आलेले आहे. मा. अशोक पवार, सहाय्यक वनसंरक्षक, भामरागड वनविभाग स्थित आलापल्ली तथा वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती, निलीमा खोब्रागडे यांचे मार्गदर्शनात पुढील तपास सुरू असुन वरील कामी श्री.डी.सि.तिराणकर, वनपाल तपासणी नाका एटापल्ली, श्री. प्रदिप गेडाम, क्षेत्र सहाय्यक एटापल्ली, श्री. निलेश टेकाम, नियतक्षेत्र वनरक्षक आलापल्ली, श्री. तुषार मडावी, वनरक्षक जिमेला, श्रीएस. एस. झाडे वनरक्षक नेंडेर, श्री.जी.आर. ब्रम्हटेके वाहनचालक, स्वन्पील गंजीवार, श्याम जंजरलावार यांनी सहभाग घेऊन कार्यवाही केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular