Saturday, May 23, 2026
HomeNagapurगडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी समिती करणार,,क्रीडामंत्री नामदार संजयजी बनसोडे यांचे...

गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी समिती करणार,,क्रीडामंत्री नामदार संजयजी बनसोडे यांचे आदेश…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

४ सदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्याचे क्रीडामंत्री नामदार संजयजी बनसोडे यांचे आदेश

गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या निकृष्ट बांधकाम व कंत्राटदाराची निविदा  रद्द करण्यासंदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मागणीवरून विधानभवनात बैठक संपन्न.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकुलांना प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्याचे दिले निर्देश.

कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल करण्यात आल्याचा आमदार डॉ देवरावजी होळी यांचा गंभीर आरोप.

नागपूर, १९ डिसेंबर २०२३ ::- गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम  निकृष्ट दर्जाचे असुन व  बांधकाम अतिशय संथ गतीने होत आहे  त्यातच कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी  संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याचा गंभीर आरोप आमदार डॉ देवरावजी होळी यांनी क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या बैठकीत केले असता या सर्व प्रकरणाची चौकशी ४ सदस्य समितीच्या मार्फत करून ८ दिवसाच्या कालावधीत त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री ना.संजयजी बनसोडे यांनी विधानभवनातील झालेल्या बैठकीमध्ये सचिवांना दिले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मागणीवरून गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या निकृष्ट बांधकाम व कंत्राटदाराची निविदा  रद्द करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी विधान भवनातील उपसभापती यांच्या दालनामध्ये सदर बैठकीचे आयोजन केले .

 १ जून २०२३ पासून  दररोज ५ हजार रुपये दंड रक्कम   ठोठावूनही  कंत्राटदार शासनाच्या कोणत्याही पत्राचे पालन करण्यास प्रतिसाद देत नाही. कंत्राटदाराला फक्त कामे करण्यात व निकृष्ट दर्जाची कामे करण्यात रस असून जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ साठीही त्यांनी अशाच प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या कंत्राटदादाला काळया यादीसाठी नोटीस बजावलेली आहे.  त्यातच या कामात कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याची बाब निदर्शनास आली असल्याची माहिती आमदार महोदयांनी बैठकीत दिली असता सदर प्रकरणाची चौकशी समितीमार्फत करण्यात यावी असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

मा.मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह क्रीडा विभागाचे सचिव, आयुक्त क्रिडा व युवक सेवा पुणे, संचालक क्रीडा व युवक कल्याण, कार्यकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली, वास्तु विशारद क्रीडा संकुल बांधकाम समिती गडचिरोली, जिल्हा क्रीडा संकुलाचे कंत्राटदार यांचे सह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular