VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
सरकारनं गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी
२९३ अन्वये चर्चेतील प्रस्तावावर चर्चा करतांना विधानसभेत मांडल्या गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या.
नागपूर, १९ डिसेंबर २०२३ ::- ६५ वर्ष देशावर राज्य करून देशाला महागाई, बेरोजगारीसह विविध समस्या निर्माण करून आर्थिक संकटात टाकणाऱ्या, व देशातील शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधिमंडळात या संदर्भात प्रस्ताव आणण्याचा व त्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची घणाघाती टीका आमदार डॉ देवरावजी होळी यांनी विधानसभेत २९३ अन्वये चर्चेतील विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करतांना केली.
यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदर्भ वैधानिक महामंडळ गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगधंदे , जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज इत्यादी विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करून जिल्ह्याला राज्याला मागे ढकलण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे, उप मुख्यमंत्री ना देवेंद्र
