VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
युवा नाट्य कला मंडळ चामोर्शी यांच्या सौजन्याने “कसाई ” नाट्य प्रयोगाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन.
गडचिरोली/चामोर्शी,१०-०१-२०२४::-शहरात युवा नाट्य कला मंडळ वाळवंटी चौक चामोर्शी यांच्या सौजन्याने “कसाई या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते माझ्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात बसस्टॉप व क्रिडांगण आणि आरोग्याच्या सुविधा , विविध विकास कामांना प्रथम प्राधान्य तसेच अनेक कामे पूर्णतःवास नेण्याचा प्रामाणिक मी प्रयत्न केलेला आहे या शहराचा नागरिक व तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने जे कामे अनेक वर्षांपासून प्रलंबीत होते ते विकास कामे आपण मार्गी लावलेले आहे येत्या काही दिवसात आपल्याला परिवर्तन नक्कीच दिसेल असे आमदार महोदयांनी मत व्यक्त केले.
यावेळी नगर पंचायत उपाध्यक्ष लोमेशजी बुरांडे, बांधकाम सभापती वैभवभाऊ भिवापुरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, निशांतजी नैताम , सुमेध तुरे, प्रतिक राठी तथा नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
