Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliखासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनी तेरा मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण...

खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनी तेरा मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण सोहळा संपन्न…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२७-०१-२०२४::- आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे निमित्याचे औचित साधून पी.एम जनमत योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभाग गडचिरोली येथे आदिम जमातीच्या लोकांना उत्तम, दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, आदिम जमातीचे लोक हे अतिदुर्गम भागात राहत असल्याने त्या दुर्गम भागात आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून पी.एम जनमत योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी तेरा मोबाईल मेडिकल युनिट मंजूर करण्यात आले.हि मोबाईल मेडिकल युनिट प्रत्येक दुर्गम भागात जाऊन आरोग्याच्या विविध सेवा पुरविण्यात यावे. यासाठी फिरते आरोग्य तपासणी पथक म्हणून गडचिरोली जिल्ह्याकरिता तेरा मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते फित कापून हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आले.      यात धानोरा,एटापल्ली, भामरागड,अहेरी येथे दोन मोबाईल मेडिकल युनिट व बाकी प्रत्येकी एक एक तालुक्यात अशा पद्धतीचें तेरा मोबाईल मेडिकल युनिट चे प्रजासत्ताक दिनी मंजूर मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण करण्यात आले.

      या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये एक मेडिकल ऑफिसर,एक एनएम,एक फार्मासिस्ट,एकलॅब टेक्निशियन व एक ड्रायव्हर अशा प्रकारचे पाच लोकांचा समूह या मोबाईल युनिटमध्ये काम करण्याकरिता समाविष्ट आहे.

      याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते,आमदार डॉ.देवराव होळी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, विधानसभा विस्तारक दामोदर अरिगेला,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,मुख्याधिकारी आयुषी सिंह मॅडम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे,अति. मुख्याधिकारी भुयार साहेब, डॉ.प्रफुल हुलके, डॉ.विनोद म्हशाखेत्री,डॉ.पंकज हुलके, तसेच मोठ्या संख्येने आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular