Saturday, May 23, 2026
HomeKasanasurउप पोलिस स्टेशन कसनसुर येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा...

उप पोलिस स्टेशन कसनसुर येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी  

 गडचिरोली/कसनसुर,२८-०१-२०२४::-26 जानेवारी रोजी उपपोलीस स्टेशन कसनसुर येथे 08.20 वा. प्रजासत्तक दिनानिमित्त ध्वजावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला.प्रभारी अधिकारी धिरसिंग वसावे ह्यांनी ध्यजारोहण करून हजर असलेल्या सर्वाना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगून शासन राबवित असलेल्या विविध कल्याण कारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमाकरिता मौजा कसनसुर येथील सरपंच कमलताई हेडो , गावं पाटील रायजी मडावी, वन विभागाचे अधिकारी श्री खंडाते, ddc बँकेचे मॅनेजर श्री सोनवणे साहेब, प्राथ .आरोग्य केंद्र कसन सूर येथील डॉक्टर मेश्राम मॅडम शासकीय मा.आश्रम शाळा कसनसुर येथील मुख्यध्यापक श्री कुळमेथ सर,व शिक्षक वृंद जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कसनसुर येथील शिक्षक वृंद साहेब तसेचगावातील इतर प्रतिष्ठीत नागरिक व जिल्हा पोलीस एसआरपीएफ चे अधिकारी व अमलदार हजर होते. शासकीय आश्रम शाळा कसनसुर तसेच जिल्हापरिषद शाळेतील मुलींनी सांस्कृतिक नृत्य सादर केले.त्यांना प्रोत्साहन पर बक्षिस देण्यात तसेच शासकीय आश्रम शाळेतील गरजू विदयार्थ्यांना चप्पल वाटप करण्यात आले . जमलेल्या सर्वाना नाष्टाची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट 16 एस आर पी एफ चे कंपनी नायक साळुंखे साहेब, रोहित जाधव साहेब बोरसे साहेब, जाधव मेजर भांगे मेजर व इतर कर्मचारी ह्यांनी सहभाग घेतला

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular