VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/अहेरी,२८-०१-२०२४::- तालुक्यातील मरनेली(राजाराम) येथील मंजू ईश्वर तलांडे वय 35 वर्षे ही महिला खूप दिवसापासून अपेनडिक्स/ किडणी स्टोन या आजाराने ग्रस्त आहे.आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याने चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अत्यंत अडचण होती.यामुळे संपूर्ण तलांडे कुटुंब चिंतेत होतं.पण ही माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मंजू ईश्वर तलांडे या महिलेला आर्थिक मदत केली.आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करणार असे आश्वासन तलांडे कुटूंबाला दिले.
अहेरी इस्टेट चे राजे,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपघात ग्रस्त,कॅन्सर ग्रस्त आणि आर्थिक अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करत असतात.त्यांनी आतापर्यंत अनेक गरजवंताला आर्थिक मदत केली आहे.
