Saturday, May 23, 2026
HomeAheriआलापल्ली येथे रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम...

आलापल्ली येथे रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

      आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आला.

   गडचिरोली/अहेरी,२८-०१-२०२४::-तालुक्यातील आलापल्ली येथे आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन कडून आयोजित रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.क्रिकेट सामन्याच्या उदघाटन पूर्वी गोटूल पासून क्रिकेट मैदानापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढुन,महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.

   या उदघाटन सोहळ्याला सह उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम तर अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठित व्यक्ती ईश्वरजी वेलादी प्रमुख पाहुणे म्हणून आलापल्ली ग्राम पंचायत चे उपसरपंच विनोदजी अकनपल्लीवार,माजी सरपंच दिलिप गंजीवार,माजी सरपंच विजय कुसनाके,आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष उमेश आत्राम,ग्राम पंचायत सदस्य मनोज बोल्लूवार, ग्राम पंचायत सदस्य संतोष अर्का, ग्राम पंचायत सदस्य मायाताई कोरेत,लक्ष्मण जंगमवार, केसनवार काका,शंकर सिडाम,पत्रकार संघटनेचे सल्लागार माकडे सर,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

   यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील ज्वलंत समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

  रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम तर द्वितीय पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्याकडून असे एकूण दोन पुरस्कार ठेवण्यात आले.

 आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन कडून आयोजित रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रतीक गेडाम यांनी मानले.या रात्रकालीन टेनिस बॉल सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला आलापल्ली येथील वार्ड क्रमांक दोन, तीन व पाच येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अध्यक्ष रुपेश आत्राम,प्रतीक गेडाम, तिरुपती वेलादी,आशुतोष येनगंदलवार,लक्ष्मण येनगंदलवार,सूरज मडावी,रोहन येदासलवार,राहुल सिडाम,नोमेश आलाम, रोहित सडमेक,समीर बावणे सह आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन च्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular