VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
श्रीनगर व परिसरातील गावकऱ्यांशी चर्चा करत जाणून घेतल्या स्थानिक समस्या.
मूलचेरा,०१-०२-२०२४::- तालुक्यातील श्रीनगर येथील सार्वजनिक श्री श्री राधाकृष्ण भजन मंदिर येथे आयोजित सोलहप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.
मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील विविध गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीनगर येथे सोलहप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मंदिरास भेट देऊन विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.
यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुनील सरकार,सचिव महादेव सरकार,नंदा पाल,नारायण सरकार,प्रभास मिस्त्री,मनोज मिस्त्री,हिरा मालाकार,रॉबिन मिस्त्री,निखिल सरकार,नितेश सरकार,सुरंजन मंडल, नरेश मिस्त्री,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,विनोद कावेरी,प्रवीण रेषे सह मंदिर कमिटीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
