VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
सहकार महर्षी मा. प्रकाश जी सावकार पोरेड्डीवार यांची प्रमुख उपस्थिती, एकाच रात्रीत 5 नाट्य प्रयोगाचे उदघाटन.
गडचिरोली/आरमोरी,०९-०२-२०२४::- तालुक्यातील मौजा कुरुड (कोंढाळा) येथे सुरु असलेली नाट्य परंपरा आजही सुरु असून येथिल स्थानिक नागरिक सहकार्य करीत असल्याने एकोपा दिसून येत आहे ही परंपरा अशीच टिकून राहावी. श्री दत्त प्रासादिक नाट्य समाज झुरे मोहल्ला व श्री दत्त प्रासादिक नाट्य समाज पारधी मोहल्ला यांच्या वतीने नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी महिला व बाल कल्याण सभापती रोशनीताई पारधी, भाजपा तालुका अध्यक्ष कुरखेडा चांगदेव जी फाये, नगराध्यक्ष पवन जी नारणवरे, भाजपा वडसा ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनीलजी पारधी, शंकरजी पारधी, मोतीलाल कुकरेजा, सदानंदजी कुथे, पंकजजी खरवडे, नंदूजी नाकाडे सागरजी नाकाडे उपस्थित होते
