Saturday, May 23, 2026
HomeAheriपेंटीपाका,टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी - मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या...

पेंटीपाका,टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी – मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे होणार सुजलाम-सुफलाम.

गडचिरोली/अहेरी,११-०२-२०२४४::- बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश आले आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातुन गोदावरी, प्राणहिता इंद्रावती सारखे बारमाही नद्या वाहतात.मात्र,याभागात एकही सिंचन प्रकल्प नाही.त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व रेगुंठा सारख्या भागात उपसा सिंचन योजना आणण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मागील अनेक वर्षापासून प्रयत्न केले. अखेर बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या या उपसा सिंचन योजनेला नुकतेच अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती स्वतः मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे.

या उपसा सिंचन योजनेमुळे सिरोंचा तालुक्यातील बरेच गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल आणि विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होईल.परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा परिसरातील अनेक गावे सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजनेसाठी मी प्रयत्न करत होतो.बरेच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पेंटींपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत पाणी उपसून ते सिंचनासाठी वापरले जाणार आहे. योजनेमुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल आणि विहिरींच्या भूजल पातळीत वाढ देखील होईल. एवढेच नव्हे तर या भागात रोजगाराच्या संधीही वाढतील.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular