Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा भोंगळ कारभार,, काम झाले २०२२ ला आणि फलक...

ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा भोंगळ कारभार,, काम झाले २०२२ ला आणि फलक लावले २०२४ ला…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/मुरमाडी,२३-०२-२०२४::- गडचिरोली तालुका मुख्यालय पासून २५ किलोमीटर अतरावर असलेल्या मुरमाडी या गावी ग्रामिण पाणी पुरवठा योजनेतंर्गत सन २०२२ या वर्षात जि. प. शाळा व अंगणवाडी केंद्र येथे पाणी पुरवठा नळ योजना राबविण्यात आली. त्या योजनेत प्रचंड अनियमितता झाली असल्याने त्याची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी सचिन भुसारी यांनी जिल्हा परिषद सिईओ ला दिलेल्या निवेदनातून केली आहे. सन २०२२ या वर्षात ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जि. प. गडचिरोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मुरमाडी येथे नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली असून सदर योजनेचा फलक दि. २०/०२/२०२४ ला लावण्यात आला आहे. पंरतु सदर फलकावर योजनेची किमत व निविदा किमत लिहलेली आहे. पंरतु झालेला खर्च तपशिलाप्रमाणे लिहण्यात आलेला नाही आणि फलकावर विंधन विहिर व्यास १५० मो. मी. खोली ६० मी. दाखवली आहे. पंरतु प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी विंधन विहीर उपलब्ध नाही. त्यामुळे या कामाची मोका चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन भुसारी यांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे सीईओ यांना तक्रार देवून मागणी केली आहे..

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular