VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
माल्लेर माल येथिल कबड्डी सामन्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाट्न.
जय सेवा कबड्डी मंडळ माल्लेर माल, माल्लेर चक यांच्या सौजन्याने.
गडचिरोली/चामोर्शी,२६ फेब्रुवारी २०२४::-तालुक्यातील माल्लेर माल येथे जय सेवा मंडळ यांच्या वतीने भव्य दिवस – रात्र कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या सामन्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले याप्रसंगी आपल्यातील कला कौशल्य दाखवून उंच शिखर गाठण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे त्यासोबत सामाजिक क्षेत्रात आपले कार्य जनतेसाठी समाजकार्य करावे असे आव्हान आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने सरपंच वसंतराव चलाख, उपसरपंच नेताजी रायसिडाम, तालुकाध्यक्ष आनंदभाऊ भांडेकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, तालुका उपाध्यक्ष जयराम जी चलाख, विलासराव कुकडे, तथा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
