VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
खरपुंडी येथे पंचायत समिती गणाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत बैठक.
गडचिरोली,२ एप्रिल २०२४ ::- देशाचे लाडके नेते पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अशोक भाऊ नेते यांना निवडून आवश्यक आहे . त्याकरिता भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन नेते साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी खरपुंडी येथील पं.स. गणाच्या बैठकीच्या प्रसंगी केले.
यावेळी प्रामुख्याने लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपा नेते डॉ. नितीनजी कोडवते, तालुका अध्यक्ष विलास पा. भांडेकर, तालुका महामंत्री बंडुजी झाडे, महामंत्री रमेश नैताम,अरुण नैताम, तथा बूथ पालक, बूथ प्रमुख उपस्थित होते.
