Monday, November 2, 2026
HomeGadchiroliअनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी 'स्टँड अप इंडिया' मार्जिन मनी योजना...

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ मार्जिन मनी योजना…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,१३ जून २०२४::- केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरूणांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास ‘स्टँड अप इंडिया’योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येईल. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 व 09 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या WWW.Maharashtra.gov.in संकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. 

गडचिरोली जिल्हयातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरूणांनी कार्यालय, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल. आय. सी. ऑफीस रोड, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,गडचिरोली यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular