VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/अहेरी,२१ जून २०२४::- नगरपंचायतचे उपाध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते शैलेशभाऊ पटवर्धन यांनी अहेरीत वार्ड नंबर 5 येते नुकतेच नवीन घरचा वस्तू पूजन गृहाप्रवेश कार्यक्रम आयोजित केली आहे.”या”सदर गृहाप्रवेश कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालावार यांनी उपस्थित राहून पटवर्धन कुटुंबियांना भेट वस्तू देत शुभेच्छा दिले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पटवर्धन परिवारातील नातेवाईक सदस्य उपस्थित होते.
