Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliशहरातील विविध समस्यांचा लवकरात लवकर निराकरण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा ऍड. विश्वजीत...

शहरातील विविध समस्यांचा लवकरात लवकर निराकरण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

नगरपरिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी यांच्याकडे ऍड विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांची निवेदनाद्वारे मागणी. 

गडचिरोली,२७ जून २०२४::- 26 जून रोजी  नगरपरिषद गडचिरोली चे मुख्याधिकारी यांच्याकडे गडचिरोली शहरातील विविध समस्यांविषयी निवेदन देण्यात आले.

 मागील तीन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र सह गडचिरोली नगरपालिकेमध्ये सुद्धा प्रशासन कार्यरत आहे मागील वर्षभरापासून शहरातील नालीसफाई चे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे दिसून येत आहे. नाली सफाईकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे हे यावरून स्पष्ट होते. मागील तीन वर्षापासून पालिका प्रशासनाने नाली सफाईची निविदा न काढता हेतू परस्पर जुन्यास कंत्राटदाराला मुदतवाढ दिलेली आहे. तरी आपण तात्काळ नवीन निविदा काढाव्या व शहरातील नागरिकांना वरील होत असलेला अन्याय दूर करावा.

संपूर्ण शहरात फवारणी करण्यात यावी.

भूमिगत गटार योजनेचे काम नगरपालिकेतर्फे करण्यात आले सदर काम करीत असताना कंत्राटदाराने शहरातील रस्त्यावरील पाच चेंबर उंचावर घेतल्यामुळे बरेचसे अपघात होत असतात. व घरगुती चारचाकी वाहनाचे चेंबर फुटलेले आहे तरी सदर कंत्राटदाराला रोडचे काम योग्य पद्धतीने करायचे आदेश प्रदान करावे.

 शहरातील जनतेला दोन वेळा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.

 गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात येत असलेल्या बहुसंख्य वार्डातील पथदिवे बंद आहेत ते पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.

स्मशानभूमी मध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

भूमिगत गटार लाईन चे चेंबर त्याचे सर्वे करण्याबाबत.

घर टॅक्स कमी करण्याबाबत.

वीर बाबुराव शेडमाके चौक ते पोटेगाव बायपास रोडला जोडणारा 1800 मीटरच्या डीपी रोडचे काम भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहे पावसाळा सुरू झाला असल्याने अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे तरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर त्वरित मुरूम टाकण्यात यावे.

या विविध मागण्यांना घेऊन सदर निवेदन *ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस* यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. आणि गडचिरोली नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी येत्या सात दिवसात या सर्व मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित सतीश भाऊ विधाते शहराध्यक्ष, वसंत पाटील राऊत तालुकाध्यक्ष, कुणाल पेंदोरकर महासचिव युवक काँग्रेस, दत्तात्रय खरवडे प्रमोद वैद्य, कमलेश खोब्रागडे, युवक काँग्रेसचे अतुल मल्लेरवार, सुरेश भांडेकर, रमेश जी चौधरी, नंदु वाईलकर, समीर ताजने, संजय चन्ने, युवक काँग्रेसचे नितेश राठोड, माजीद सय्यद, लताताई मुरकुटे, सौ गौतमा गेडाम, गीतांजली सूर्यवंशी, सौ मनीषा सूर्यवंशी, लता मुरकुटे, मधुकरजी नाईक प्रफुल जी आंबोरकर,जावेद खान, अजय भांडेकर, प्रभाकर जी वासेकर, गुलाबराव मडावी, सुनील जी डोगरा, विवेकजी घोंगडे, संजय मेश्राम नगरसेवक, जावेद शेख, सर्वेश पोपट, हेमंत मोहितकर, कल्पक मुप्पीडवार, कुणाल ताजने, टया खान, उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular