VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
सार्वजनिक दुर्गा तथा कालिमाता मंदिर जवळ सभागृह बांधकामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणार.
गडचिरोली/चामोर्शी,१५ जुलै २०२४::- तालुक्यातील मौजा आष्टी येथील सार्वजनिक दुर्गा तथा कालिमाता मंदिर जवळ सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरोदिया बेंगाली सेवा समिती च्या वतीने निवेदन देऊन निधी उपलब्ध करून देण्याकरिता निवेदनातून मागणी केली असून सदर बांधकामासाठी लागणारा निधी 15 लाख रुपये आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी निवेदनकर्ते हलदार, समद्दार, दीपक रॉय, सुनील मंडल, बिमल सेन उपस्थित होते.
