Saturday, May 23, 2026
HomeChamorshiस्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन, विविध विषयावर चर्चा व सतत सुरु असलेल्या...

स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन, विविध विषयावर चर्चा व सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला – माजी आ.डॉ.नामदेवराव उसेंडी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी चामोर्शी तालुक्यात आज स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन, विविध विषयावर चर्चा व सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

   गडचिरोली/चामोर्शी२९ जुलै २०२४::-  या भेटीत अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या पडझडी, पूरग्रस्त क्षेत्रात वाहतूक ठप्प होणे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यासारख्या गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

  तसेच तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वांगाने प्रयत्न करणार असल्याच्या शब्द उपस्थित सर्व संघटनेचे सदस्य व गाव भेटी दरम्यान गावकऱ्यांना दिला.

यावेळी दिवाकरजी कोहळे अध्यक्ष, रमेशजी येडलावार उपाध्यक्ष, अरुणजी गव्हारे, आशिषजी पिपरे, रमेशजी अधिकारी, माणिकजी कोहळे, रामेश्र्वरजी मेश्राम, राजु जी धोडरे, यशवंतजी त्रिकांदे, विनोदजी किरमे, विनोदजी खोबे, गणेश मडावी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular