Saturday, May 23, 2026
HomeAheriमोफत नेत्र तपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ - माजी प.स. सदस्य...

मोफत नेत्र तपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ – माजी प.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०५ ऑगस्ट २०२४::- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच डॉ.मिताली आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अहेरी येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.४ ऑगस्ट रोजी इंडियन फंक्शन हॉल येथे संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास ६०० पेक्षा अधिक रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

अहेरी विधानसभा क्षेत्र हा अतिदुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना जिल्हा मुख्यालय किंवा चंद्रपूर, नागपूर सारख्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिका’र हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे. दरम्यान अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष मोतीबिंदू सारखे आजार दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या उदात्त हेतूने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच त्यांची अर्धांगिनी डॉ.मिताली आत्राम यांनी ४ ऑगस्ट रोजी अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

विशेष म्हणजे या शिबिरात डॉ. ध्रुबोज्योती साहा, डॉ.स्नेहा अग्रवाल तज्ञ डॉक्टरांनी व त्यांच्या चमूने नेत्र तपासणी,मोतीबिंदू तपासणी व मोफत उपचार केले. तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील तारीख देऊन त्यांना प्राचारण करण्यात आले. अहेरी उपविभागातील एटापल्ली, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात आलेल्या रुग्णांची वॉलेंटियर कडून योग्य काळजी घेण्यात आली तसेच त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिरासाठी हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या चमूने अथक परिश्रम घेतले.

“लेजर मशिनद्वारे नेत्र तपासणी”

इंडियन फंक्शन हॉलमध्ये आयोजित नेत्र तपासणी शिबिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे सकाळी १० वाजेपासून तर ४ वाजेपर्यंत जवळपास ६०० च्या वर रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. बाहेरून आलेल्या रुग्णांची योग्य काळजी घेऊन नेत्र तपासणी व योग्य मार्गदर्शन तसेच औषध उपचार करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केला.

“आत्राम दाम्पत्याचा अभिनव उपक्रम”

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य तसेच सून डॉ.मिताली भालावी आत्राम यांनी अहेरी उपविभाग ‘मावा स्वास्थ मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा दिले जात आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन राव बाबा आत्राम यांची अर्धांगिनी डॉ.मिताली आत्राम ह्या वैद्यकीय क्षेत्रातून असल्यामुळे त्यांनी स्वतःला या क्षेत्रात झोकून घेतल्याने दुर्गम भागातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. त्यांच्याकडे दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठी चमू देखील उपलब्ध आहे. सतत खेड्यापाड्यात शिबिर घेऊन आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular