Saturday, May 23, 2026
HomeChamorshi"गीता रायसिडाम" यांचे सरपंच पदावरून पायउतार,, "उपसरपंच" सुनील रामगोनवार यांच्या प्रयत्नाला यश...

“गीता रायसिडाम” यांचे सरपंच पदावरून पायउतार,, “उपसरपंच” सुनील रामगोनवार यांच्या प्रयत्नाला यश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांचा चौकशी अहवालात मान्य.

गडचिरोली/चामोर्शी,०६ ऑगस्ट २०२४::- येथील पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चाकलपेठ येथील सरपंच गीता विकास रायसिडाम यांनी पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ४ एप्रिल २०२४ चा चौकशी अहवाल आदेश कायम ठेवत नागपूर विभागाचे अपर आयुक्त यांनी सरपंच पद व सदस्यत्व रद्द केल्याने पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या चाकलपेठ येथील उपसरपंच सुनिल जगन्नाथ रामगोनवार यांनी विविध आरोप करत त्यांच्याविरोधात अर्ज करून पायउतार करण्याची मागणी केली होती.

     यावर गैरअर्जदार सरपंच यांनी आरोपाचे खंडन करत प्राथमिक आक्षेप अर्ज दाखल केला होता. उपसरपंच सुनील रामगोनवार यांनी केलेले आरोप ग्राह्य धरत गडचिरोली जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांचा चौकशी अहवाल मान्य करून गीता रायसिडाम यांना सदस्य व सरपंच पदाकरिता अपात्र ठरविण्यात येत असल्याचे नागपूर विभागाचे अपर आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular