Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी परिवाराला उपचारासाठी आर्थिक मदत...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी परिवाराला उपचारासाठी आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०६ ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील नैनेर येथील रहिवासी मेंगा मडावी यांची पत्नी सौ.राजी मेंगा मडावी यांना प्रकृती ठिक नसल्याने काही दिवशी अगोदर अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते भर्ती करण्यात आली.मात्र डाक्टरांनी त्यांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होती.

मेंगा मडावी यांच्या घरचा आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने मडावी कुटुंबियांना औषध आणि इतर खर्चासाठी अडचण भासत होती.सदर माहिती काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्या मडावी परिवाराला आर्थिक मदत करण्यात आले.

दरम्यान कंकडालवार म्हणले की’यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून मडावी कुटुंबियांना मोठा धीर दिला.त्यावेळी समस्त मडावी परिवारातील सदस्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले आहे.

मदत करतांना वेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,नरेंद्र गर्गम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शंकर सिडाम,सतिश पोरतेट,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular