VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/लखमापूर बोरी ०८ ऑगस्ट २०२४::-दिनांक 7 ऑगस्ट 2024 बुधवारला केंद्रस्तरीय प्रधम शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा लखमापूर बोरी येथे संपन्न झाली. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेतील मु.अ. श्री महेंद्र वासेकर तथा उदघाटक म्हणून श्री देवेंद्र सत्तरवार शा. व्य. स. अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे म्हणून श्री हेमंत चावरे सर, मार्तीवर सर, बोईनावर सर, उंदीरवाडे सर.. दुर्गे सर, चलाख मॅडम, पिपरे सर हे होते.. संचालन श्री. फिरोज पठाण सर यांनी केले तर आभार कु. उंदीरवाडे मॅडम यांनी मानले .. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बोडावर सर यांनी केले, या वेळी मानपुरे सर यांनी शिष्यवृत्ती यावर मार्गदर्शन केले.. तर चलाख मॅडम यांनी पि जि या विषयावर मार्गदर्शन केले, शिक्षण परिषद ला सर्व केंद्रातील शिक्षक उपस्थित होते तसेच महेंद्र वासेकर सर यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
