Sunday, June 14, 2026
HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर यांचे नेतृत्वात शिक्षकांच्या...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर यांचे नेतृत्वात शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासंदर्भात निवेदन सादर.

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,२० ऑगस्ट २०२४::- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली येथे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी विरेंद्र चौधरी,उपशिक्षणाधिकारी(प्राथ)विवेक नाकाडे.वेतन अधिक्षक वैभव बारेकर यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर यांचे नेतृत्वात शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासंदर्भात निवेदन सादर. यावेळी प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात मुद्देनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली.भेटीदरम्यान शिक्षकाच्या सर्व प्रलंबित समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी साहेब,मा.उपशिक्षणाधिकारी साहेब,मा.वेतन अधिक्षक साहेब यांनी आश्वासन दिले.याप्रसंगी निवेदन देतांना व चर्चा करतांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर,जिल्हा सरचिटणीस श्री आशिष धात्रक सर,जिल्हा कोषाध्यक्ष श्री राजेश चिलमवार सर,जिल्हा उपाध्यक्ष श्री अशिमकुमार बिश्वास सर, जिल्हा सल्लागार श्री निलकंठ निकुरे सर,गडचिरोली तालुकाध्यक्ष श्री धनेश कुकडे सर,धानोरा तालुकाध्यक्ष श्री राजू मुंडले सर,मुलचेरा तालुका कार्याध्यक्ष श्री अशोक बोरकुटे सर‌ यांसह शिक्षक संघाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चर्चेत प्रामुख्याने निवेदनातील प्रमुख प्रलंबित समस्यांसह खालील समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

१)सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाच्या भविष्य निर्वाह निधी च्या पावत्या त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात.

२) केंद्र प्रमुख पदावरील पदोन्नती करीता सर्व विषयांतील B.Ed. उत्तीर्ण पदवीधर शिक्षकांची यादी मागविणे बाबत.

३) गडचिरोली जिल्ह्यातील केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक (भाषा, गणित/विज्ञान व सामाजिक शास्त्र) यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावी.

४) मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टी चे शुद्धिपत्रक त्वरित काढण्यात यावे.

५) शनिवारी सकाळची शाळा पुर्वीप्रमाणेच ७.३० ते ११.०० या वेळेत भरविण्यात यावी.

६)दुपारपाळीतील शाळा पुर्वीप्रमाणेच १०.३० ते ५.०० या वेळेत भरविण्यात यावी.

७)नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगातील मुळ वेतनानुसार १५ टक्के किंवा सरसकट रुपये १५००/- प्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावे.

८) आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ त्वरित देण्यात यावी.

९)४ टक्के सादील अनुदान जिल्हा परिषद शाळांना त्वरित अदा करण्यात यावे.

१०) निवडश्रेणी मंजुर झालेल्या शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करून थकबाकी अदा करण्यात यावी.

११) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत उर्वरीत शिक्षकांचे वरीष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी चे प्रस्ताव संबंधित पं.स.कडून मागवुन मंजुर करण्यात यावे.

१२)सन २०१८ मध्ये पंचायत समिती सिरोंचात प्रशास कीय बदली होऊन आलेल्या शिक्षकांचे बदली प्रवास भत्ताचे देयके त्वरित अदा करण्यात यावे.

१३) B.L.O.सह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढण्यात यावे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular