
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/एटापल्ली,०९ सप्टेंबर २०२४::- एटापल्ली येथील श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक यांच्या वतीने स्थानिक शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. सदर चित्रकला स्पर्धा गावाची संस्कृती व परंपरा, महिलांन वरील अत्याचार थांबवा, माती संवर्धन, कुत्रीम बुद्धिमत्ता, हवामान बदल, मानसिक आरोग्य जागरूकता या विषयावर घेण्यात आली. स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता स्पर्धा प्रमुख अमोल गजाडीवार, वृषाली हिचामी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी राघवेंद्र सुल्वावार अध्यक्ष, राहुल कुळमेथे उपाध्यक्ष, संपत पैडाकुलवार सचिव, उमेश संगर्ती कोषाध्यक्ष, रोहित बोमकंटीवार सदस्य, आतिष खापणे, प्रणय कासवाटे, महेंद्र सुल्वावार, साहिल हमंद उपस्तीत होते.
