Saturday, May 23, 2026
HomeChamorshiसार्वजनिक गणेश मंडळ सोनापूरतर्फे रक्तदान शिबीर संपन्न शिबिरात 31 दात्यानी केले रक्तदान...

सार्वजनिक गणेश मंडळ सोनापूरतर्फे रक्तदान शिबीर संपन्न शिबिरात 31 दात्यानी केले रक्तदान…

VAINGANGA NEWS 24/ PRATINIDHI – दिलखुश बोदलकर

गडचिरोली/चामोर्शी,११ सप्टेंबर २०२४::- सार्वजनिक गणेश मंडळ सोनापूर तर्फे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवील्या जात असते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते हेच पाहून मंडळातर्फे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सोणापुर इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी रक्त पेढी गडचिरोली येथील चमु ने रक्तदात्यांचे रक्तगट तपासून रक्त संकलन केले.

रक्तदान शिबिरामध्ये मारोती बुरे, आशिष चलाख, मारोती संगावार, विनोद लाटेलवार, अतुल धोटे, योगेश चालख, निशांत टेकाम, हसमुख कोहळे, रुपेश टेकाम, संकेत दुधबावरे, मारोती धोटे, सूरज पिपरे, आदित्य मडावि, औदूत टेकाम, साईनाथ टेकाम, राम राजू पाल, महेंद्र टेकाम, मनोज सहारे, प्रशांत कुनघाडकर, विशाल येजुलवार, दतदीप पिपरे,जगदीश भोयर, तुषार कोहळे, भूषण दुधबावरे, नवनीत गाडगीलवार, अमोल साखरे, योगेश वासेकर, आकाश पिपरे, पुरषोत्तम कोडाप, सूरज मडावी, अंकुश धोटे इत्यादींनी रक्तदान केले.सर्व रक्तदात्याना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांना फळ व खाऊ दिले. रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी सर्वजनिक गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular