



VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर/ब्रम्हपुरी,११ सप्टेंबर २०२४::- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावात आज दि.विजेचा धक्का लागून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुधवारी घडली. शेतात काम करत असताना तुटलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात आणखी एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार शेतकरी त्यांच्या शेतात काम करत असताना अचानक विद्युत तार तुटून जमिनीवर पडल्याने हा अपघात झाला. असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, वीज विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
