Friday, May 22, 2026
HomeMumbaiगडचिरोली शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १३१ कोटी   मंजूर,अखेर आ.डॉ.देवरावजी होळी गडचिरोली शहरवासीयांची...

गडचिरोली शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १३१ कोटी   मंजूर,अखेर आ.डॉ.देवरावजी होळी गडचिरोली शहरवासीयांची तहान भागविण्यात  यशस्वी…

मा मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणविस, ना.अजित पवार यांचे मानले आभार.

मुंबई, १४ सप्टेंबर २०२४::- गडचिरोली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात या ठिकाणी पाण्याची निर्माण होणारी टंचाई दूर करण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्या प्रस्तावाला मंजूरी मिळावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडे लावून धरली होती. अखेर या मागणीला मंजुरी मिळाली असून गडचिरोली शहराच्या वाढीव पुरवठा योजनेसाठी १३१ कोटी रुपये मंजूर करण्यात आमदार डॉक्टर देवराज होळी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे भविष्यात गडचिरोली शहरवासीयांची पाण्याची तहान शमणार आहे.* *मुंबई येथील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.देवेन्द्रजी फडणविस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे मानले आभार मानले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular