
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
Gadchiroli/चामोर्शी,१७ सप्टेंबर २०२४::- चामोर्शी येथे जशने ईद ए मिलादु नबी हा मुस्लिम बांधवांच्या सण हजरत मोहम्मद पैगम्बर यांचे जन्म दिवसाच्या निमित्य मोठ्या उसहात साजरा करण्यात आला . मो .पैगंबर दिलेली शिकवणी चे चिंतन तथा दया करुणा आणि विश्वासाचे सिधान्त नुसार जीवन जगण्याची प्रतिब्धताला नवीनीकृत करते .या निमित्य चामोर्शी येथील जामा मस्जिद येथे सकाळी 9:00 वा .परचम कुशाई (ध्वजारोहण )मस्जिद चे सेक्रेटरी लतीफ खान यांचे हस्ते पार पडले .नाथ चे वाचन करीत जमा मस्जिद पासून बाजार पेठ मार्गे अ .शहा बाबा यांचे दर्गे पावेतो जुलूस काढन्यात आले. या वेळी हाफिज म्ह्न्सुर आलम यांनी सर्व भारतीयांन साठी अमन व शांती साठी प्रार्थना केली. यावेळी आमदार डॉ .होळी यांचे तर्फे हत्ती गेट वर शरबतचे आयोजन करण्यात आले होते .मस्जिद मध्ये कुराणखाणी चे आयोजन करण्यात आले. रैलित लहान मुलांनी चॉकलेट व खजूरचे वाटप केले यावेळी सामूहिक भोजन सुध्दा वाटप करण्यात आले होते. ईदच्या जुलूस मध्ये चामोर्शी परिसरातील कुरुंड ,तळोधी ,बोरी ,वाकडी येथील मुस्लिम समुदाय बहुसंख्यने उपस्थित होते .कार्यक्रमाला सफल करण्यासाठी नियाजूधीन खान ,रिजवान शेख ,मौलाना मुक्बिल रजा ,फिरोझ खान ,अफजल खान ,अरशद खान ,रियाज शेख ,नाजिम शेख ,हाफिज सय्यद ,शाकीर शेख ,साजिद शेख ,बादशाहभाई ,फैयाज शेख ,अरमान खान ,कामरान खान ,निहाल शेख ,अली रजा ,अमजद पठाण ई .लोकांनी अथक परिश्रम घेतले.
