
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर/ब्रम्हपुरी,१६ सप्टेंबर २०२४ ::- ब्रम्हपुरी शहरातील ६० वर्षाची गौरवशाली परंपरा गणपती मानाचा,ब्रम्हपुरीचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी परंपरा शाबुत ठेवली.गणपती मानाचा ब्रह्मपुरीचा राजा व भारतीय जनता पार्टी कार्यालय तसेच प्रा.अशोकजी सालोटकर यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केलेली होती.


या निमित्ताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी आरती करून दर्शन घेत गणपती बाप्पा चरणी सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य , शांती, आरोग्य देवो हीच बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली..तसेच भाजपा कार्यालयात मा.खा.नेते यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप करुन आस्वाद घेतला.यावेळी प्रामुख्याने ब्रम्हपुरी भाजपा तालुकाध्यक्ष अरुणजी शेंडे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.वंदना ताई शेंडे, शहराध्यक्ष अरविंदभाऊ नांदुरकर, सामाजिक नेत्या तथा मंडळाचे अध्यक्ष सुषमाताई खानोरकर,सचिव रशमी पेशने (खानोरकर) भाजयुमोचे जिल्हा महामंत्री तनय देशकर,मनोज वठ्ठे, साकेत भानारकर, सूयोग बाळबुद्धे, मनोज भुपाल, प्रा.अशोकजी सालोटकर, स्वप्निल अलगदेवे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.
