Thursday, July 30, 2026
HomeAlapalliराष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ०९ बटालियन...

राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ०९ बटालियन तर्फे आल्लापल्ली बस स्टॉप परिसरात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

Gadchiroli/आलापल्ली,०३ ऑक्टोंबर २०२४::- स्वच्छ भारत अभियान हा भारताच्या ४,००० हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे.

हे अभियान २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाले. आज सीआरपीएफ 9 बटालियन अहेरी कडून ग्राम स्वच्छता अभियान नेहमी राबविण्यात येते, सीआरपीएफ हे ९ बटालियन सोशल काम अंतर्गत अनेक समाज कार्य करत असतात,

सामाजिक उपक्रम राबवत असतात, कोरोना काळात अल्लापल्ली गावात सफाई स्वच्छता सॅनिटायझरेशन केले.अनेक सेवा दिली. आज २ ऑकटोबर रोजी सर्वात प्रथम आलापल्ली शहरात झाडू मारून गाव स्वच्छ केले त्यानंतर बस स्टॅन्ड येथे केर कचरा जमा करून कचरा गाडी मध्ये ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा टाकण्यात आला. त्यात सीआरपीएफ च्या सर्व जवान आणि अधिकारी अथक परिश्रम करून संपूर्ण गाव स्वच्छ केले.

या कार्यक्रमात सरपंच शंकर मेश्राम, स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात, सीआरपीएफ चे शंभू कुमार कमांडेंट ०९ बटा,डॉक्टर चंद्र शेखर मोहन मु.चिकित्सा अधिकारी ०९ बटा,बिमल राज सी.द्वितीय कमन अधिकारी ०९ बटा,के.एल.तुलसी उप कमांडेंट ०९ बटा,कमलेश इंदौरा सहायक कमांडेंट ०९ बटा तथा वाहिनी के अधीनस्थ अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून

रवि भांडककर आदिवासी निर्देशक विकास विभाग अहेरी,शंकर मेश्राम सरपंच आल्लापल्ली,अमोल कोलपाकवार (उपध्यक्ष व्यापारी असोसिएशन ) श्रावण वाकोडे वैनगंगा न्यूज चे मुख्य संपादक व आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालय चे सदस्य, कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular