Sunday, May 24, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल ) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल ) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ०३ ऑक्टोंबर २०२४::- दिनांक 2/10/2024 रोज बुधवार ला सकाळी 7.30 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा( माल) येथील प्रांगणात *राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मुरखळा(माल) ग्रामपंचायत चे सन्माननीय सरपंच श्री भास्कर बुरे,ग्राम विकास अधिकारी आर.के.बारसागडे,ग्रामप़चायत सदस्या श्रीमती तुंबडे ताई,मुरखळा(माल) येथील प्रतिष्ठित नागरिक श्री लालाजी गेडाम,

श्री यादव बुरे,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजय राजूरवार,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) चे मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार,शाळेतील पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर*, श्री अशोक जुवारे सर, श्री चंद्रकांत वेटे सर, श्री कमलाकर कोंडावार सर,सौ.सोनिताई संदोकार मॅडम,*ग्रामपंचायत मुरखळा(माल )चे कर्मचारी वृंद श्री शामराव निशाणे,

श्री सचिन तुंबडे,श्री राकेश नैताम,श्री मानिक घोगरे, शालेय पोषण आहार मदतनीस श्रीमती पुष्पा मोहुरले,श्रीमती नयना मोहुरले,श्रीमती सरिता सरपे यांचे प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

या जयंती कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या या जयंती कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम गावातील मुख्य मार्गावरुन प्रभातफेरी काढण्यात आली.प्रभातफेरीतुन स्वच्छता विषयक जाणीव जागृती करण्यात आली.तसेच उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.जयंती निमित्ताने शाळाअंतर्गत व शाळेबाहेरील परिसर तसेच बाजाराच्या जागेतील परिसर स्वच्छ करण्यात आले.आजच्या जयंती कार्यक्रमानिमित्त उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच शाळेतील विविध वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी जयंती निमित्त भाषणे दिली.आजच्या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजकुमार कुळसंगे सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांनी केले तर आभार श्री जगदीश कळाम सर यांनी मानले.कार्यकमाची सांगता उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular