
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १२ ऑक्टोबर २०२४::- मा.खा.अशोकजी नेते यांची गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या जवळील प्रांगणात सकल हिंदु समाज व दसरा उत्सव समिती गडचिरोली च्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या रावण दहणाच्या कार्यक्रमाला मा.खा.तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य श्री. अशोकजी नेते यांनी या आयोजित रावण दहणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून नागरिक जनतेला विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार डॉ.देवरावजी होळी,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपचे जेष्ठ नेते रमेश जी भुरसे, कार्यक्रमाचे आयोजक विश्व हिंदु परिषदचे रामायणजी खटी, आयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गडचिरोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
