
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
Gadchiroli /धानोरा, १२ ऑक्टोंबर २०२४::- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धानोरा तालुका संघटनात्मक बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत किसान भवन धानोरा येथे आयोजित करण्यात आली.बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी संबोधित करत बुथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांना घर घर चलो अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर जाऊन आपल्या महायुती सरकारने व केंद्र सरकारने जनसामान्यांसाठी विविध योजना काढलेले आहेत व त्याचा लाभ जनता घेत आहे या योजनांची सविस्तर माहिती व सरकारने केलेल्या कामाची माहिती या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवा व त्यांना योजनांचा लाभ घेण्यास सहकार्य करा, तसेच आपल्या महायुती सरकारने लाडकी बहिणी करिता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली.

परंतु विरोधकांकडून अशी अफवा पसरवण्यात येत आहे की महायुती सरकार सत्तेत आल्यास ही योजना बंद करेल परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यास ही योजना बंद होणार नाही. पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यास ही योजना नक्की बंद होईल कारण ही योजना बंद करण्याची भाषा काँग्रेसचे नेते करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती च्या उमेदवारांना निवडून द्या असं जनतेला पटवून सांगण्याची गरज आहे. त्यामुळे घर घर चलो अभियान अंतर्गत जनतेपर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बुथ प्रमुख व शक्ति केंद्र प्रमुखांना केले.त्याप्रसंगी प्रामुख्याने गडचिरोली विधानसभा विस्तारक आकाश सातपुते, धानोरा तालुकाध्यक्ष लताताई पुंघाटी, शहरध्यक्ष सारंग साळवे, तालुका महामंत्री विजय कुंभरे, राकेश दास, संजय कुंडू, महादेव गणोरकर, मिलिंद किरंगे, सुभाष खोबरे, प्रकाश मारबते, घनश्याम मडावी, सुगंधाबाई उईके, अनुसयाबाई कोरेटी तसेच बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
