Friday, July 31, 2026
HomeAlapalliआलापल्ली येथे (तेलगू) अर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन - माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या...

आलापल्ली येथे (तेलगू) अर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन – माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

Gadchiroli/अहेरी : सार्वजनिक महिला बतकम्मा मंडळ वेलगूर रोड,आलापल्ली तर्फे श्रवण जानपदा धूमधाम (तेलगू) आरक्रेस्ट्रा कालबृन्धम दिनांक 09 ऑक्टोबर 2024 वेळ सायं 7 :30वा आलापल्ली येथील संपन्न झालं आहे.अजय कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मंडळ ठिकाणी व महिला बतकम्मा मंडळ जवळ अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहे.त्यांच्यातून वेलगूर रोड,आलापल्ली येथे श्रवण जानपदा धूमधाम (तेलगू) आरक्रेस्ट्रा कालबृन्धम कार्यक्रम अजय कंकडालवार कडून आयोजित केले आहे.सदर श्रवण जानपदा धूमधाम (तेलगू) आरक्रेस्ट्रा कालबृन्धम कार्यक्रमाचे उदघाटन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.

यावेळी अजय कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली कंकडालवार,रेखा हणमंतू मडावी,भाग्यश्री बेझालवार,रेखाताई,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,चंदू बेझालवार,स्वप्नील मडावी,बबलू शेख,चिंटू आत्राम,जावेदभाऊ,रिंकू आत्राम,वाहन चालक सचिन पंचार्य,वाहन चालक प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील समस्त नागरिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular