Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliमहायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंदजी नरोटे यांचे वाजतगाजत नामांकन मा.खा.अशोकजी नेते, वि.प.आम.डॉ. परिणयजी फुके,जिल्हाध्यक्ष...

महायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंदजी नरोटे यांचे वाजतगाजत नामांकन मा.खा.अशोकजी नेते, वि.प.आम.डॉ. परिणयजी फुके,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

निर्धार मेळाव्यातून केला विजयाचा संकल्प,, मा.खा.अशोक नेते.

गडचिरोली,२८ आक्टोंबर २०२४::- गेल्या १० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करत महायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांनी नामांकन दाखल केले. यावेळी वि.प. आ. डॉ. परिणयजी फुके, माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समितीचे व स्टार प्रचारक श्री. मान. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, कि.मो.प्रदेश सचिव रमेश जी भुरसे, सहकार प्रकोष्ठ आशिषजी पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे नेते राजूभाऊ कावळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

माजी खा.अशोकजी नेते यांच्या चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीतील खुल्या वाहनावर उमेदवार डॅा.मिलिंदजी नरोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी विराजमान होते. रॅलीत प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, डॅा.चंदा कोडवते, रमेश बारसागडे,अनिल पोहकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गोवर्धन चव्हाण, सुधाकर पेटकर, आकोली बिश्वास, प्रतिमा सरकार, परिमल सरकार, ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

ही रॅली एसडीओ कार्यालयावर पोहोचल्यानंतर तिथे नामांकन दाखल करण्यात आले. यानंतर शिवाजी महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या गंगूवार मैदानावर निर्धार मेळावा घेण्यात आला. यावेळी आ.परिणय फुके यांनी सर्वसामान्य जनतेचा कौल डॅा.नरोटे यांच्या बाजुने असल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आल्याचे स्पष्ट केले. या विजयाच्या निर्धार मेळाव्याला मा.खा.नेते यांनी संबोधित करतांना केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले धडाडीचे निर्णय, लाडकी बहिणसारख्या कल्याणकारी योजनांमुळे महायुतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा संकल्प या मेळाव्यातून करूया असे आवाहन यावेळी विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक माजी खासदार अशोक नेते यांनी केले. या विधानसभा क्षेत्रात आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख करत त्यांनी डॅा.नरोटे हे उर्वरित कामांना गती देतील,

असा विश्वास व्यक्त केला.शेतकरी, शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नावर भर देणार-डॅा.नरोटेउमेदवार डॅा.नरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर भाजपने जो विश्वास दाखविला तो सार्थ करून दाखवेन, असे सांगितले. या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या, युवक वर्गाच्या, शिक्षण आणि आरोग्याच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. अशोक नेते यांनी मेडीकल कॅालेज आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता त्यात विविध सुविधा देण्यावर माझा भर राहील, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular