
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी येथील मतदान केंद्रावर संपूर्ण परिवारासह केले मतदान.
गडचिरोली, २० नोव्हेंबर,२०२४::- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या सौभाग्यवती सौ बिनाराणी देवराव होळी, मुलगी डॉक्टर देवश्री होळी व मुलगा डॉक्टर दिपेश होळी यांच्या सह चामोर्शी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन विधानसभा निवडणुकीत अवश्य मतदान करावे असे आवाहन त्यांनी मतदान करतांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील मतदारांना केले आहे.
