VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/ कुरखेडा, दि.३० नोव्हेंबर २०२४ ::- कुरखेडा तालुक्यातील मौजा-सोनेरांगी( ता. कुरखेडा) येथे संगीतमय शिव महापुराण व ग्रामगीता भक्ती सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या शिव महापुराण कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हणाले अशा धार्मिक कार्यक्रमाची जनतेला आज नितांत गरज आहे. या धार्मिक कार्यामुळे मन उत्साहीत व प्रफुलित राहते.

आचार विचार संस्काराची निर्मिती होते. त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन या शिव महापुराण प्रसंगी मा.खा.नेते यांनी व्यक्त केले.या बरोबरचं पुढे बोलत हे शिव महापुराण परमपूज्य साध्वी तेजस्विनी दीदी पाठक याच्या वाणीतील प्रवचनातून साकार होत असुन या प्रवचनाचा चांगला लाभ घेऊन हे प्रवचन कृतीत उतरवत चांगले आचार विचार आत्मसात करावे तरच अशा धार्मिक कार्यक्रमाचे फलित होते.

असे बोलत मोदी सरकारच्या केलेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळावर प्रकाश टाकत देश प्रगती पथावर असुन आपण दिलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व धन्यवाद मानतो असे यावेळी नेते यांनी प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद जी कुथे सर,सामाजिक नेते पिंटुभाऊ आकरे, पत्रकार सेवा सहारे,पत्रकार शालिक जनबंधु,तसेच गावातील नागरिक सरपंच व उपसरपंच यांच्यासह मोठ्या संख्येने बंधू भगिनीं उपस्थित होते.

