VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली / आष्टी,०२ डिसेंबर २०२४::- गडचिरोली झाडीपट्टी रंगभूमी ही सांस्कृतिक अस्मिता व नाट्यनिष्ठेच्या बाबतीत सुप्रसिद्ध आहे. दरवर्षी होणारे शेकडो प्रयोग, हजारो कलावंतांच्या रोजगाराचे साधन असलेली व करोडोची उलाढाल करणारी रंगभूमी आता केवळ पाहण्याचाच, अनुभवण्याचाच नाहीतच अभ्यासाचा विषयही झालेली आहे. झाडीपट्टी रंगभूमीची दखल संभाजीनगर येथून प्रकाशित होणाऱ्या तिफण नियतकालिकाने घेतलेली असून ध्येयवेडे प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांच्या तिफनचा झाडीपट्टी रंगभूमी विशेषांकाचे लोकार्पण सुप्रसिद्ध कलावंत, निर्माता ,दिग्दर्शक प्रा.डॉ.शेखर डोंगरे , आत्मारामजी खोब्रागडे, पायल यांच्या शुभहस्ते ,माजी जि.प.सदस्य अमरभाऊबोडलावार ,माजी पं . स.सभापती दीपकभाऊ सातपुते चेकदरुरचे सरपंच रविंद्रभाऊ पाल, संपादक डॉ.राजकुमार मुसनेइत्यादी मान्यवर व नाट्यप्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आले. चंद्रकमल थिएटर्स वडसा या नाट्य मंडळाचे लोकेश कुमार, विश्वास पुडके, चिदानंद सिडाम ,स्वप्निल बनसोड, पोर्णिमा तायडे ,मनीषा देशपांडे ,मिलिंद गोंगले, सुहास , आशिष झाडे विठ्ठल बोरकुटे यांच्या उपस्थितीत ‘पापी पुत्र’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. संपादक डॉ राजकुमार मुसळे यांनी झाडीपट्टी रंगभूमीचे स्वरूप आणि ग्रंथ निर्मिती मागील प्रयोजन स्पष्ट केले. रंगकर्मी डॉ. शेखर डोंगरे यांनी रंगभूमीचा आवाका व ग्रंथांचे महत्त्व प्रतिपादन केले. साहित्य,कला आणि लोकसंस्कृतीला वाहिलेले ञैमासिक तिफणचां अंकही वाचनीय व संदर्भ मूल्य असलेला मौलिक दस्ताऐवज आहे. झाडीपट्टी रंगभूमी विशेषांकाचे मुखपृष्ठ सुबक , आकर्षक असे किशोर उरकुंडवार यांनी केले असून मलपृष्ठावर अरुण झगडकर यांची झाडीप्रदेशाचे वर्णन असलेली कविता आहे. झाडीपट्टीच्या विविध अंगावर प्रकाश टाकलेला हा अंक निश्चितच सर्वांना उपयुक्त ठरेल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.
