Saturday, May 23, 2026
HomeChamorshiशारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ खेळावे - मा.खा.अशोकजी नेते यांचे प्रतिपादन...

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ खेळावे – मा.खा.अशोकजी नेते यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जय बजरंग क्रिडा मंडळ मौजा-नागपुर चक यांच्या सौजन्याने दिवस -रात्रकालीन भव्य कबड्डी सामने.

“तसेच”

सार्वजनिक नवयुवक क्रिडा मंडळ मौजा -वायगांव यांच्या वतीने भव्य ग्रामीण रबरी बाँल क्रिकेट सामने ता.चामोर्शी येथे आयोजित.

गडचिरोली/चामोर्शी, १३ डिसेंबर २०२४::- चामोर्शी तालुक्यातील युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज दिं. १२ डिसेंबर ला जय बजरंग क्रिडा मंडळ,मौजा- नागपुर चक यांच्या सौजन्याने दिवस -रात्रकालीन भव्य कबड्डी सामने तसेच सार्वजनिक नवयुवक क्रिडा मंडळ मौजा -वायगांव यांच्या वतीने भव्य ग्रामीण रबरी बाँल क्रिकेट सामने ता.चामोर्शी जि. गडचिरोली द्वारा आयोजित करण्यात आले होते. कबड्डी व क्रिकेट या दोन्ही कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी बोलतांना आजच्या काळी मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे.कारण आजचे अनेक युवक वर्ग हे दिवसेंदिवस मोबाईल मध्यें व्यस्त असतांना दिसते अशावेळी त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही.यासाठी शरीर तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी अशा मैदानी खेळाचे अतिशय आवश्यक आहे. आठ दहा दिवस चालणाऱ्या या दोन्ही खेळाला शुभेच्छा देतोय आपण चांगल्या पद्धतीने व वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे.

असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले.याबरोबरच पुढे बोलतांना म्हणाले मि माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विकासाभिमुख कामे केली यामध्ये वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग, तसेच जिल्ह्यामध्ये रेल्वेचे जाळे,मेडिकल काॅलेज,सुरजागड लोह प्रकल्प, कृषि महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, हवाई पट्टा,रस्त्याचे कामे, नँशनल हाँयवे ची कामे, सिंचनाच्या बाबतीत चिचडोह बॅरेजेस, कोटगल बॅरेजेस, असे अनेक विविध विकासाचे कामे लोकसभा क्षेत्रात केलेली आहेत.आपल्या गावातील अडीअडचणी समजून घेत आपण लोकसभेमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल आभार तसेच नुकत्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभेतील भाजपाचे उमेदवार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात आपल्या गावाचा सहकार्य लाभला त्याबद्दल मी सुद्धा आपले मनापासून आभार व्यक्त करतो.

मी आपल्या गावच्या अडीअडचणी समजुन घेत आपल्या नागरिक जनतेच्या सतत सेवेत मि सदैव राहीन व होत असलेली विकासाची कामे न थांबवता आपल्या नेहमीच पाठीशी अडचणीत राहील अशी ग्वाही देतोय ! असे प्रतिपादन मौजा – नागपूर चक व वायगांव या गावातील कबड्डी व क्रिकेट या दोन्ही खेळाच्या प्रसंगी मा.खा.नेते यांनी व्यक्त केले.यावेळी नागपुर चक व वायगांव या गावातील मंडळाने मा.खा.अशोकजी नेते यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष तथा चामोर्शी चे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे ‌यांनी माननीय मा.खा.नेते यांना गावातील उदभवणाऱ्या विविध समस्या जाणत व निदर्शनास आणुन देत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी प्रामुख्याने नागपुर चक येथील जेष्ठ नेते पत्रुजी भाकरे, नंदाजी आभारे,ताराचंद वेलादी,दिवाकर भोयर,डॉ.हेमंत भाकरे,नोमेश जुवारे,राजेश सयाम,युवराज खेडेकर, देवराव जुवारे,

यावेळी वायगांव येथील भाजपा नेते किसनजी कोसरे, माजी.पं.स.सदस्य विनोद मडावी,सामाजिक नेते रामदास नेवारे,राजगोपालपुर,ग्रा.प.सदस्य साईनाथ आत्राम तसेच नागपुर चक व वायगांव येथील नागरिक जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular