Saturday, May 23, 2026
HomeAramori२० लाख रुपये निधीचे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन - माजी आमदार कृष्णाजी गजबे...

२० लाख रुपये निधीचे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन – माजी आमदार कृष्णाजी गजबे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/देसागंज, १३ डिसेंबर २०२४::- स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत वैशिष्ठ पुर्ण निधीच्या माध्यमातुन देसाईगंज येथिल विपश्यना केन्द्राकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याच्या खडिकरण बांधकामाचे भुमिपुजन माजी आमदार क्रिष्णाभाऊ गजबे यांचे हस्ते पार पडले देसाईगंज येथे विपश्यना केन्द्रात नियमित ध्यान साधना शिबिर सुरु असतात या केन्द्राकडे जाणारा पांदन रस्ता हा शेतकर्यांच्या आवागमनाचा रस्ता असल्याने शेती च्या हंगामात या रस्त्याची अतिशय दुरावस्था होते. त्यामुळे विपश्यना ध्यानसाधनेला जाणार्या साधकांना ञास सहन करावा लागतो. या संदर्भात साधकांनी व शेतकर्यांनी आमदार क्रिष्णाभाऊ गजबे यांच्याकडे पांदन रस्त्याचे खडीकरण करुन देण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत देसाईगंज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कुलभुषन रामटेके यांचेशी चर्चा करुन २० लक्ष रुपये निधीची तरतुद करुन दिली. सदर रस्त्याचे खडिकरण देसाईगंज नगर परिषद यंञने मार्फत करण्यात येत असुन या कामाचे भुमिपुजन माजी आमदार क्रिष्णाभाऊ गजबे यांचे हस्ते आज पार पडले या प्रसंगी राजरतन मेश्राम डॉ वंदना धोंगडे, रुपेश सुखदेवे पृथव रामटेके, विजय हेडाऊ अनुताई कुर्हा, विजया मोटघरे प्रतिभा रहाटे, राहुल बोरकर न प चे इंजिनियर सौरभ नंदनवार, अमोल पजे, नागमोती प्रकाश राहाटे’ मुश्श्यु पटेल, मोहसिन सय्यद, नसिम पठान, रशिद शेख, सुनिल दोनाडकर यांचेसह साधक व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते आपल्या स्थानिक निधीतुन विपश्यना ध्यानसाधनाकडे जाणार्या रस्त्याचे भुमिपुजन होत असल्याचे समाधान या प्रसंगी माजी आमदार क्रिष्णाभाऊंनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular