Saturday, May 23, 2026
HomeChamorshiचंद्रपूर- येथून थेट हावडा ( कोलकाता )करिता रेल्वे सुरू करावे...

चंद्रपूर- येथून थेट हावडा ( कोलकाता )करिता रेल्वे सुरू करावे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

चंद्रपूर येथून देशातील 14 राज्यात ट्रेन सेवा असताना पश्चिम बंगाल येथे ट्रेन सेवा का नाही?

डॉ, प्रणय खुणे- प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.

बंगाली समाज जनअधिकार संघर्ष समिती ची गेल्या अनेक वर्षा पासूनची मागणी पूर्ण होईल का?.

गडचिरोली/ चामोर्शी, २१ डिसेंबर २०२४::- बंगाली समाज जनधिकार संघर्ष समिती व मतुआ महासंघ पदाधिकारी सत्यजित पोद्दार यांचे पुढाकाराणे चामोर्शी तालुक्यातील दुर्गापुर येथे वार्षिक मतूआ संमेलन आयोजित करण्यात आले या संमेलनात विदर्भातील विविध ठिकाणातील मतूआ समाज भाविक भक्त सहभागी झाले होते ,व विविध प्रांतातील गोसाई गोविंद यांनी मार्गदर्शन केले.

व स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी होऊन मतुआ समाज धार्मिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला यावेळी प्रामुख्याने मतूआ महासंघ पदाधिकारी व बंगाली समाज जन अधिकार संघर्ष समिती चे वतीने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे, व जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांचा शाल श्रीफळ स्मृती चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला व मतूआ महासंघ पदाधिकारी यांचा वतीने संत्रागाछी ट्रेन ला माजरी येथून टर्न करून चंद्रपूर गोंदिया हावडा ( कोलकाता )पर्यंत थेट रेल्वे गाडी सुरू करण्याबाबत डॉ खुणे यांना निवेदन देण्यात आले,

गेल्या अनेक वर्षांपासून सदर मातुआ अनुयायी व बंगाली बांधवांचे वतीने मागणी केली जात आहे परंतु मागणी च्या केंद्र सरकारने अजून पर्यंत या मागणीचा विचार केला नाही? असे विचार संघटनेद्वारे मांडण्यात आले व डॉ, प्रणय भाऊ खुणे भाऊ यांना सदर मागणी संघटनेचे मुख्य संयोजक डॉ, सत्यजित पोद्दार यांनी निवेदनाद्वारे केले यावेळी डॉ, प्रणय खुणे यांनी सदर मागणीची दखल घेतली व चंद्रपूर येथून देशातील 14 राज्यांमध्ये ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परंतु पश्चिम बंगाल येथे का नाही? असा प्रश्न डॉ खुणे यांनी केला व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सदर मागणी केंद्र सरकार कडे करण्यात येईल असे प्रतिपादन केले ,त्यावेळी बंगाली समाज जनधिकार संघर्ष समिती मुख्य संयोजक डॉ,सत्यजित पोद्दार पदाधिकारी गोविंद मंडल,दीपक अधिकारी डॉ, विश्वजीत विश्वास आणि फणीभूषण मंडल डॉ, दिनेश मंडल शोभा अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular