VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मुंबई,०३ जानेवारी २०२५::- मुख्यमंत्री आदरणीय श्री. Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांकडे जप्त असलेल्या राज्यातील ९६३ शेतकऱ्यांच्या एकूण ४९४९ एकर शेतजमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात येणार आहेत. गेली अनेक दशके या जमिनी महसूल विभागाकडे आहेत.या जमिनीचा लिलाव करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याला त्याची जमीन परत मिळण्याची सुवर्णसंधी सरकारद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. रेडी रेकनर दराच्या केवळ २५% रक्कम भरून शेतकरी बांधवांना सरकार दरबारी जमा असलेली आपली जमीन परत आपल्या नावावर करून घेता येणार आहे. अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता. मी महसूलमंत्री झाल्यानंतरचा शेतकरी हिताचा हा पहिलाच निर्णय असल्याचा विशेष आनंद मला आहे. मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
