Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliबोदीन चकमक चौकशीसंदर्भात निवेदन आमंत्रित...

बोदीन चकमक चौकशीसंदर्भात निवेदन आमंत्रित…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १७ जानेवारी २०२५::- उप पोलीस स्टेशन पेंढरी अतर्गत पो.म. के. गोडलवाही हद्दीतील मौजा बोदीन जंगल परिसरात दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान दोन पुरुषाचे मृतदेह अग्निशस्त्रासह आढळले होते. या घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात दंडाधिकारी चौकशी करण्यात येत आहे. तरी या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यानी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभगीय दंडाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे 15 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी सादर करावे, असे आवाहन सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली राहुल कुमार मीना यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular