Tuesday, September 15, 2026
HomeGadchiroliवनपाल अडकला एसीबीच्या जाळ्यात,, स्वीकारली होती 20000 ची लाच...

वनपाल अडकला एसीबीच्या जाळ्यात,, स्वीकारली होती 20000 ची लाच…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, २५ जानेवारी २०२५::- रेती वाहतूकीच्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठीं वीस हजार रुपयाची लाच घेताना वनपाल लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कार्रवाई 24 जानेवारी रोजी करण्यात आली असून पुराडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या कोहका येथील वनपाल नरेंद्र सीताराम तोकलवार असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदाराकडे ट्रॅक्टर असून घरकुलासाठीलागणारी रेती ट्रॅक्टरने वाहतूक करीत असताना वनपाल नरेंद्र तोकलवार याने त्यास थांबवून ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यास सदर लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे 23 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी दरम्यान नरेंद्र सिताराम तोकलवार याने तक्रारदारास ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवार 24 जानेवारी रोजी ला.प्र.वी गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचखोर वनपाल नरेंद्र तोकलवार यास पोलिसांनी अटक केली आहे.

सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे.सदर कारवाई दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात व चंद्रशेखर ढोले, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली यांच्या परिवेक्षणात शिवाजी राठोड, पोलिस निरिक्षक, पोलिस निरिक्षक संतोष पाटिल, स. फौ. सुनिल पेद्विवार, पो. हवा. शंकर डांगे, संदीप घोरमोडे, संदीप उडान, राजेश पद्मगिरवांर, प्रविण जुमनाके हितेश जेट्टिवार, म.पो. शी. जोत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, चालक. पोहवा राजेश्वर कुमरे यांनी केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular