VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, २८ जानेवारी २०२५::- तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय प्रशासनाच्या वतीने दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चामोर्शी शहरातील जिल्हा परिषद शाळा , माध्यमिक शाळा , कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले . सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये येथील स्वामी विवेकानंद मतिमंद विद्या .चामोर्शीच्या विद्याथ्र्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ ,सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन , तहसीलदार प्रशांत घोरुडे ,पोलीस निरीक्षक अमूल कादबाने ,तालुका कृषी अधिकारी अमित तुळराम ,नायब तहसीलदार राजू वैद्य , सुखदेव कावळे , गिरीश नरोटे , तारेशफुलझले ,पुरवठा निरीक्षक मोनिका राऊत, देवस्थानचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर ,माणिक तुरे ,शिक्षक ,शिक्षिका,विद्यार्थी व शहरातील नागरिक उपस्थित होते . या कार्यक्रमाकरिता तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .
