VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
अ.भा.श्री.गुरुदेव मंडळ पारडी ला सुद्धा सदिच्छा भेट.
चंद्रपूर/ सावली,०२ फेब्रुवारी २०२५ ::- कला दर्पण क्रिकेट क्लब पारडी, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित भव्य अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या बक्षीस सोहळ्याचे मुख्य अतिथी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते होते.
त्यांच्या शुभहस्ते विजेत्या संघांना गौरविण्यात आले.बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुनजी भोयर, तर प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी पाल, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सामाजिक नेते देविदासजी बानबले, तालुका महामंत्री सतिशजी बोम्मावार, भाजपा ज्येष्ठ नेते दौलतजी भोपये, माजी पंचायत समिती सभापती छायाताई शेंडे, उपसरपंच पारस नागापूरे, युवा नेते दीपकभाऊ शेंडे,केशव बट्टे, अशोक नागापूरे, मोरेश्वर पोटे,बालाजी चौधरी, दशरथ पाल, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी खासदार अशोकजी नेते म्हणाले, “खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. युवकांनी नियमित खेळ खेळावा, यामुळे शरीर निरोगी राहते आणि नवचैतन्य निर्माण होते. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास साधता येतो.”तसेच दौऱ्यात गाडीवरून येत असतांना गावातील रस्त्यांची दुरवस्था पाहून चिंता व्यक्त केली. “मी खासदार असताना या रस्त्याचे खडीकरण करून मजबुतीकरण केले होते. मात्र, सध्या तो अतिशय खराब अवस्थेत आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत आहे आणि लवकरच योग्य उपाययोजना केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष अर्जुनजी भोयर, सामाजिक नेते देविदासजी बानबले, तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत खेळ आणि सामाजिक कार्याचा परस्पर संबंध स्पष्ट केला.*अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ पारडी ला भेट*याच दौऱ्यात माजी खासदार अशोकजी नेते यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, पारडी येथे ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमात सामाजिक एकता आणि आध्यात्मिक जीवनाच्या गरजेवर भर देत या संपूर्ण सोहळ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी क्रिकेट स्पर्धा आणि पुण्यतिथी महोत्सव या दोन्ही कार्यक्रमांना मनःपूर्वक पाठिंबा दर्शविला.
